नववीपासून त्रिभाषा धोरण

नववीपासून त्रिभाषा धोरण
Published on

हेड
नववीपासून त्रिभाषा धोरण

सबहेड
‘सीबीएसई’कडून घोषणा
आता तीन भाषा अनिवार्य

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली- मुंबई, ता. १६ ः केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ आणि ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-२०२३’ नुसार इयत्ता नववी आणि दहावीच्या भाषा अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. नववीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष-२०२६-२७ पासून त्रिभाषा धोरणाचे सूत्र लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाआहे. विद्यार्थ्यांना त्यामुळे तीन भाषांचा अभ्यास करणे अनिवार्य असेल.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून देशातील कोणतीही भाषा निवडता येईल; मात्र त्या विषयाची परीक्षा देणे बंधनकारक नसेल. या भाषेचे मूल्यमापन शालेयस्तरावर होईल आणि त्याचे गुण मंडळाच्या प्रमाणपत्रात नोंदविले जाणार आहेत. इयत्ता दहावीत तिसऱ्या भाषेसाठी बोर्डाची परीक्षा होणार नाही. या विषयातील कामगिरीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला मंडळाच्या परीक्षेला बसण्यापासून रोखले जाणार नाही.
----
कसे असेल धोरण?
‘सीबीएसई’च्या त्रिभाषा धोरणामध्ये प्रामुख्याने दोन भारतीय भाषा, तर तिसरी भाषा भारतातील कुठलीही किंवा परकीय भाषा घेता येईल. त्यासाठी ‘आर-१’, ‘आर-२’, आणि ‘आर-३’ हा फार्म्युला लागू केला जाणार आहे. तिसरी भाषा म्हणून परकीय भाषा निवडली तरी उर्वरित दोन भाषा भारतीय असणे अनिवार्य असेल.
----
भाषेसाठी तात्पुरती व्यवस्था
‘माध्यमिक’ची स्वतंत्र पाठ्यपुस्तके येईपर्यंत या शैक्षणिक वर्षांत नववीच्या विद्यार्थ्यांना जुनी पाठ्यपुस्तके वापरता येतील. त्यासोबतच शाळांना स्थानिक किंवा राज्यस्तरीय साहित्य (कथा, कविता, लेख) पूरक अभ्यासक्रम म्हणून वापरण्यास सांगण्यात आले आहे. इयत्ता सहावीची पुस्तके एक जुलैपूर्वी शाळांना उपलब्ध करून दिली जातील. या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना पंधरा जूनपर्यंत जाहीर केल्या जातील, असे मंडळाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com