

MPSC has clarified that its Computer-Based Test (CBT) system is fully secure and protected against hacking and paper leaks.
sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांच्या आयोजनासाठी परीक्षा व्यवस्थेत बदल करण्यात आला असून ऑनलाइन परीक्षेला राज्यभरातून विरोध होत आहे. असे असताना एमपीएससीने उमेदवारांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी ‘वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर’ (एफएक्यू) स्पष्टीकरण दिले आहेत. परीक्षा प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पूर्णपणे सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह असेल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.