कवठे गावात ‘क्रांती फाउंडेशन’कडून 32 सीसीटीव्ही कॅमेरे; सुरक्षिततेस नवे बळ
कवठे गावास ‘क्रांती फाउंडेशन’तर्फे
३२ सीसीटीव्ही कॅमेरे
सुरक्षिततेस नवे बळ; सामाजिक बांधिलकीतून उपक्रम
कवठे, ता. २५ : सेवाभावी क्रांती फाउंडेशनने कवठे, विठ्ठलवाडी आणि वाघजाईनगर परिसरात मोक्याच्या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचे, ब्रँडेड कंपनीचे नाईट व्हिजन असलेले ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गावाच्या सुरक्षा व्यवस्थेला नवे बळ दिले आहे.
ग्रामपंचायतीच्या विनंतीनुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत सर्व कॅमेरे ग्रामपंचायत कार्यालयात लाइव्ह स्वरूपात सुरू करण्यात आले आहेत. संपूर्ण सिस्टीम अधिकृतपणे ग्रामपंचायत कवठे यांच्या ताब्यात देण्यात आली असून, पुढील काळात या यंत्रणेची योग्य देखभाल, दुरुस्ती व सुरक्षा ग्रामपंचायतीमार्फत केली जाणार आहे.
या प्रकल्पासाठी क्रांती फाउंडेशनच्या सभासद वर्गणीमधून सुमारे तीन लाख २५ हजार एवढा खर्च करण्यात आला. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून उचललेले हे पाऊल गावकऱ्यांमध्ये समाधान व सुरक्षिततेची भावना निर्माण करणारे ठरत आहे. या उपक्रमात कवठे गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. क्रांती फाउंडेशनमध्ये ज्ञानदीपचे आजी-माजी संचालक, सेवकवर्ग, विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त व सेवेत असलेले अधिकारी, शेतकरी, व्यावसायिक, पोलिस व सैन्यदलातील सदस्य तसेच डॉक्टर्स यांचा यात सक्रिय सहभाग आहे.
फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वीही गावात जलसंधारण, प्राथमिक शाळा विकास, पर्यावरण संवर्धन अशा अनेक सामाजिक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या क्रांती फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सभासद, तसेच सहकार्य करणारी ग्रामपंचायत कवठे आणि मदत करणाऱ्या सर्वांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.
प्रतिक्रिया :-
कोट
गावाच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पासारखे उपक्रम हे केवळ सुविधा नसून सामाजिक जबाबदारीचे प्रतीक आहेत. आगामी काळातही अशा समाजहिताच्या कार्यासाठी सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवावा, हीच अपेक्षा.
एकनाथ जगताप, संचालक, ज्ञानदीप को- ऑप. क्रेडिट सोसायटी, मुंबई
सोबत फोटो :
01340
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

