
वाघोली : वाघोली येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँके (सीडीसीसी ) भरतीची ऑनलाईन परीक्षा होती. मात्र पहिल्या अर्ध्या तासातच सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा झाली नाही. नंतर ती रद्दच करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या ७०० परीक्षार्थींनी केंद्रात गोंधळ घातला. पोलीस आल्यानंतर परिस्थिती निवळली.