'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी घरीच साजरी करा' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जुलै 2020

'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी घरीच साजरी करा' 

सहकारनगर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे शहरातील सर्व समाज बांधव सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पुणे शहर पोलीस व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शताब्दी जयंती महोत्सव समितीच्यावतीने घरीच जयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने लोकांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू मुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे.

तसेच पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीच्या रोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जमावबंदी सर्व धर्माची प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात तसेच संचारास अनावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय मनाई करण्याचे आदेश लागू केले आहेत.

यामुळे स्वारगेट, सारसबाग येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गर्दी करू नये. यावर्षी घरातच राहून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी जयंती महोत्सव समिती व पुणे शहर पोलिसांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate the birth centenary of Sahityaratna Lokshahir Annabhau Sathe at home says pune police