
पुणे : व्यवसाय करत असताना अनेक आव्हाने पेलत स्पर्धेत टिकण्यासाठी कायम नावीन्याचा ध्यास ठेवत यशस्वी झालेल्या आणि आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून उद्योग-व्यवसाय करत असलेल्या यशस्वी भूमिपुत्रांचा ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी व्यावसायिकांचा संघर्षमय जीवनप्रवास आणि समाजातील योगदानाच्या प्रेरणादायी कामांचा उल्लेख असलेल्या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन करण्यात आले.