ओतूरला विद्यार्थ्यांनी मांडली मराठीची महती
ओतूर, ता. २७ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील गाडगे महाराज विद्यालयात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक संपत माने यांनी दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतांतून मराठीची महती मांडली.
प्रथम संस्थेचे आधारवड वै. प्र. मा. पाटील, वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर, ‘‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’’ ही कविता इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. तर, माध्यमिक आश्रमशाळेच्या मुलींच्या ‘‘माय भूमी ही’’ कवितेने श्रोत्यांची मने जिंकली. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत करण डोईफोडे, ज्योती वायाळ, योगिता तुपे, भारती भोर, श्रवण बनकर, श्लोक पानसरे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षक राजू ठोकळ, कैलास महाजन, संपत माने यांनीही आपले विचार मांडले.
या वेळी मराठी विभागप्रमुख रामदास बगाड, माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बाबुलाल थोरात, प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सुमन घाडगे, प्रदीप मिरगे, सुनील पोकळे, भानुदास ढोबळे, निवृत्ती कुकडे, सुनील खूपसे, सचिन मुखरे, संजय मेटकरी, शिक्षक प्रतिनिधी मनीषा ठाकरे, अच्युत निकरड उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदा वळे, समाधान लवंगडे, सत्यवान भरणकर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावेश पाटील याने केले. तर, आर्यन डुंबरे याने आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

