Cement Concrete Roads in Pune City Deteriorate Potholes
sakal
पुणे - समान पाणी पुरवठ्याची जलवाहिनी टाकल्यानंतर रस्ता पूर्ववत करताना ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. सिमेंट काँक्रिट टाकल्यानंतर कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडत आहेत. महापालिका ठेकेदाराचे बिल काढत असली तरी नागरिकांना मात्र खराब रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. असाच प्रकार धायरीत समोर आला आहे.