वैराग येथील  स्मशान भूमीच्या निकृष्ट बांधकाम बाबत आरोप ,काम उत्तम दर्जाचे न केल्यास स्मशानभूमीतच उपोषणाचा इशारा

वैराग येथील स्मशान भूमीच्या निकृष्ट बांधकाम बाबत आरोप ,काम उत्तम दर्जाचे न केल्यास स्मशानभूमीतच उपोषणाचा इशारा

Published on

VRG26B06241
वैराग ः येथील वैकुंठ भूमीच्या संरक्षण भिंतीचे निकृष्ट कामाची माहिती देताना अरुण सावंत.

स्मशानभूमीच्या निकृष्ट कामाबाबत उपोषणाचा इशारा
वैराग ः नगरोत्थान योजनेतून वैराग नगरपंचायतील विविध योजनांव्दारे निधी येत आहे. त्याचा विनियोग योग्य प्रमाणात होत नसल्याचा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून स्मशानभूमी दुर्लक्षित होती. यावर्षी नगरोत्थान योजनेमधून सुमारे सव्वा कोटींचा भरघोस निधी वैराग नगरपंचायतीस प्राप्त झाला आहे. येथील पंढरपूर रोड वर संत तुकाराम वैकुंठधामसाठी काम सुरू आहे. यातून आरसीसी शेड उभारणे ४ लाख ६४ हजार ४५, स्मशानभूमी काँक्रिटीकरण, २१लाख ०४ हजार ८०२, दहन शेड बांधणे ११९८२५९, सरंक्षण भिंत बांधणे ४८९४२२६ एकूण एक कोटी २८ लाखांचा निधी खर्च करण्यात येत आहेत. सध्या स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतची तक्रार अरुण सावंत यांनी नगरपंचायतीकडे केली आहे. सावंत यांनी चक्क स्मशानभूमीतच पत्रकार परिषद घेऊन कामाचा पोलखोल केला आहे. या बांधकामांमध्ये वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम वाळूमध्ये मोठ्या प्रमाणात मातीचे प्रमाण आहे. कमी दर्जाचे सिमेंट देखील वापरण्यात आले आहे अशा विविध मुद्यावर अरुण सावंत यांनी आरोप करत प्रत्यक्ष पोलखोल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com