Cemetery Wall Repair: ‘सकाळ’च्या वृत्ताला प्रतिसाद; दावडी स्मशानभूमी भिंत दुरुस्तीला १० लाख मंजूर, आणखी निधीची ग्रामस्थांची मागणी

दावडी स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीच्या पुनर्बांधणीला आमदार निधीतून चालना; वृत्ताची दखल घेऊन कामाला युद्धपातळीवर सुरुवात
Reconstruction work on the Dawadi Crematorium Wall has begun after ₹10 lakh was sanctioned from the MLA Local Development Fund.

Reconstruction work on the Dawadi Crematorium Wall has begun after ₹10 lakh was sanctioned from the MLA Local Development Fund.

Sakal

Updated on

दावडी : दावडी (ता. खेड) येथील स्मशानभूमीची संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे कोसळल्याची बातमी ‘सकाळ’मध्ये (ता. ९) प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेतली. जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आमदार बाबाजीशेठ काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये मंजूर झाले असून संरक्षक भिंतीच्या पुनर्बांधणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com