

Electric Bus
ESakal
पुणे - केंद्र सरकारने पीएम-ई ड्राईव्ह योजनेंतर्गत पुण्यासाठी १ हजार ई-बस मंजूर केल्या आहेत. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केला होता, त्यास यश मिळाले आहे.