esakal | रामदास आठवलेंच्या राज्यसभा सदस्यत्वावर, पत्नी सीमा आठवले म्हणाल्या...
sakal

बोलून बातमी शोधा

central minister ramdas athawale rajya sabha seat seema athawale reaction

सीमा आठवले म्हणाल्या, 'आठवले गटाची नुकतीच निवडणूक आयोगाकडे नोंद झाली आहे. त्यामुळे पक्षाचे एक कोटी सभासद करण्याचे ध्येय निश्चिआत करण्यात आले असून त्यातील 50 लाख नोंदणी एप्रिलपर्यंत होईल.'

रामदास आठवलेंच्या राज्यसभा सदस्यत्वावर, पत्नी सीमा आठवले म्हणाल्या...

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा राज्यसभेवर घेणार आहेत, असा विश्वा्स आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी शनिवारी व्यक्त केला. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट देण्यासाठी पुण्यात आल्या असता आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रामदास आठवले यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत लवकरच संपत आहे. राज्यातील भाजपच्या कोट्यातील एक जागा त्यांना निश्चि त झाल्याची चर्चा आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव भाजपकडून राज्यसभेसाठी निश्चिात होणार असल्याचे दिसते. त्यामुळे खासदारपदाची मुदत संपुष्टात येत असलेले संजय काकडे यांनी उदयनराजे यांचे भाजपसाठी काय योगदान प्रश्न उपस्थित केला होता.

पुण्याच्या बातम्यां वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सीमा आठवले म्हणाल्या, 'आठवले गटाची नुकतीच निवडणूक आयोगाकडे नोंद झाली आहे. त्यामुळे पक्षाचे एक कोटी सभासद करण्याचे ध्येय निश्चिआत करण्यात आले असून त्यातील 50 लाख नोंदणी एप्रिलपर्यंत होईल. त्यादृष्टीने देशभरातील नेते व कार्यकर्ते प्रयत्नशील आहे. याचवेळी पक्षाचे संघटन मजबूत व्हावे याकरिता पक्ष बांधणी करण्यात येत आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्यातून सभासद नोंदणीकरिता चांगला प्रतिसाद मिळत आहे.' सीएए आणि एनआरसी कायद्यावरील भूमिका स्पष्ट करताना आठवले म्हणाल्या, 'केंद्र सरकारने आणलेल्या सीएए, एनआरसी कायद्याचे आम्ही समर्थन केले असून त्याबाबतचे मत रामदास आठवले यांनी संसदेत मांडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सांगलीतील तासगाव येथून निवडणूक लढविण्याबाबत मला विचारणा झाली होती. मात्र परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाही. राज्यातील महिलांवरील हल्ल्यांची स्थिती पाहता अशाप्रकारचे दावे केवळ जलदगती न्यायालयात न चालविता, अशा घटना पुन्हा घडू नये याकरिता उपाययोजना होणे गरजेचे आहे.

आणखी वाचा - सहा वर्षांच्या पोरीनं तानाजी कडा केला सर, पाहा व्हिडिओ 

सध्या वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत
राज्य सरकारने शेतक-यांच्या बाबत घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. महिलांच्या बाबतीत देखील असे निर्णय अपेक्षित आहेत. राज्य सरकारच्या कामाबाबत समाधानी नाही. हे सरकार किती दिवस चालेल हे बघू. आम्ही सध्या वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत, असे आठवले म्हणाल्या.

loading image