Water Supply Issue : मध्यवर्ती पुण्यासह पूर्व भागातील पाणी पुरवठा विस्कळित

महावितरणचा विद्युत पुरवठा कमी दाबाने झाल्याने सर्व पेठांसह लष्कर पाणी पुरवठ्याच्या अंतर्गत येणाऱ्या पूर्व भागातील पाणी पुरवठा विस्कळित झाला.
Water Supply
Water Supply esakal

पुणे - महावितरणचा विद्युत पुरवठा कमी दाबाने झाल्याने सर्व पेठांसह लष्कर पाणी पुरवठ्याच्या अंतर्गत येणाऱ्या पूर्व भागातील पाणी पुरवठा विस्कळित झाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना अचानक पाणी न मिळाल्याने तारांबळ उडाली.

शहरातील पेठांना पर्वती जलकेंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. तर लष्कर जलकेंद्रातून पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर, कोंढवा आदी भागात पाणी पुरवठा केला जातो. आज जलशुद्धीकरण केंद्रांना पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीतून कमी पॉवरने विद्युत पुरवठा होत असल्याने पंप चालविण्यात अडथळे निर्माण झाले.

पंप बंद पडत असल्याने पाणी पुरवठा होऊ शकत नव्हता. पर्वती जलकेंद्र आणि लष्कर जलकेंद्रामध्ये ही समस्या निर्माण झाली. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, सोमवार पेठ, गंज पेठ, कसबा पेठे यासह अन्य भागात बसला.

काही ठिकाणी अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने वरच्या मजल्यावर पाणी चढत असल्याने नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या. याच पद्धतीने लष्कर जलकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागात अपुऱ्या पाणी पुरवठ्याला सामोरे जावे लागले.

कडक उन्हाळ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच अचानक पाणी कमी आल्याने त्रास सहन करावा लागला. महापालिकेने यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत झाला, त्यामुळे दुपारनंतर पंप पूर्ण क्षमतेने चालण्यास सुरु झाले.

पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, ‘पर्वती व लष्कर जलकेंद्रांना पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा होत नव्हता, त्यामुळे पंप बंद पडल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळित झाला होता. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, विद्युत पुरवठा व्यवस्थित करावा असे सांगितले आहे. उद्यापासून (ता. ७) पाणी पुरवठा सुरळीत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com