
पुणे : उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना राज्यातील सर्व विद्यापीठे, शिक्षण संस्थांची आणि त्यातील अभ्यासक्रमांची माहिती आता एका ‘क्लिक’वर उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत परदेशी विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारे विविध विद्यापीठांच्या, शिक्षण संस्थांच्या संकेतस्थळावर जाऊन संबंधित संस्थांची, त्यातील अभ्यासक्रमांची आणि सुविधांची माहिती पाहावी लागत होती; परंतु यंदापासून सर्व प्रवेश प्रक्रिया एकाच संकेतस्थळावरून करता येणार आहे.