minister madhuri misal
sakal
पुणे - अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ वेळेत आणि सुलभतेने मिळावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये समन्वय वाढविण्यात येणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्यास केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सहमती दर्शविली आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही माहिती दिली.