Pune Junnar Yelnere ZP school Insurance: जुन्नर तालुक्यातील येणेरे ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम; जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांसाठी अपघाती विमा संरक्षण

जुन्नर तालुक्यातील येणेरे ग्रामपंचायतीचा शालेय विद्यार्थी व पालकांसाठी अपघाती विमा उपक्रम; जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील यांच्याकडून कौतुक
"येणेरे पॅटर्नचा पुणे जिल्ह्यात डंका!" विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत कुटुंबाच्या सुरक्षिततेचीही काळजी; ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम.

"येणेरे पॅटर्नचा पुणे जिल्ह्यात डंका!" विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत कुटुंबाच्या सुरक्षिततेचीही काळजी; ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम.

Sakal

Updated on

जुन्नर : गावांमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांचा अपघाती विमा काढणारी जुन्नर तालुक्यातील येणेरे ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली असून विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी ग्रामपंचायत ने राबविलेला उपक्रम दिशादर्शक असून या उपक्रमाचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी कौतुक केले. पुणे येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय डाक घर व ग्रामपंचायत येणेरे यांच्यामध्ये शालेय विद्यार्थी व पालक यांचा अपघात विमा काढण्यासंदर्भात बुधवार ता. 15 रोजी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी लोकनियुक्त सरपंच अमोल भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com