पोलिसांच्या रेखाचित्र रेखाटनास पुणे विद्यापीठाचे प्रमाणपत्र 

पोलिसांच्या रेखाचित्र रेखाटनास पुणे विद्यापीठाचे प्रमाणपत्र 
Updated on

पुणे : राज्यभरात घडणाऱ्या जटील गुन्ह्यांचा तपास करताना रेखाचित्र हे आरोपी शोधण्यासाठी महत्वाचे ठरते. चेहरा कसा आहे हे कळाल्याने संशयितांचा माग काढता येतो. पण यासाठी रेखाचित्र काढणारे चित्रकार बाहेरचे असतात. हेच कौशल्य पोलिस खात्यातील अधिकारी, कर्मचार्यांनी आत्मसात केल्यास पोलिसांचे काम सोपे होणार आहे. पोलिसांनी ३० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांच्यात सोमवारी (ता.२) सामंजस्य करार करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी,  पोलीस अधीक्षक संभाजी कदम, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंके, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-अधीक्षक अनुजा देशमाने, पोलीस निरीक्षक अमोल गवळी, प्रा. डॉ. गिरीष चरवड, चित्रकार समीर धर्माधिकारी, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी, तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्सचे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.

पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्यक्ष दर्शीच्या सांगण्यावरून संशयित गुन्हेगाराचे तंत्रशुद्ध चित्र रेखाटण्याचा प्रशिक्षण विभाग भारतातील पहिलाच हा सुरू करण्यात आला. त्याचे उद्घाटन  राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या हस्ते नुकतेच झाले. या विभागात अत्यंत महत्वाच्या गोपनीय तपासाच्या दृष्टीकोनातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना गोपनीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. या विषयातील भारतातील प्रथम डॉक्टरेट प्राप्त प्राध्यापक डॉ. गिरीष अनंत चरवड हे प्रशिक्षण देणार आहेत.

उपअधीक्षक अनुजा देशमाने म्हणाल्या, 'सीआयडी व पुणे विद्यापीठ यांच्यामध्ये पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रशिक्षण शिबिरासाठी राज्यातील ८४ पोलिसांची निवड करण्यात आली आहे. प्रथम पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल, त्यानंतर त्यात पात्र ठरणार्यांना १० दिवसांचे दिले जाईल. प्रत्येक टप्प्यावर पात्र ठरून पूर्ण ३० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणार्यांना पुणे विद्यापीठाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Residents of remote Khopadewadi village near Rajgad Fort were forced to perform a funeral under a tarpaulin in heavy rain due to the absence of a crematorium, highlighting the lack of basic infrastructure in the region.
Nirmala Nawale NCP appointment
Garbage bins overflowing near the entrance of Padmashri Dr. Manibhai Desai Arts and Commerce College in Uruli Kanchan have triggered concerns over hygiene and student safety, with residents questioning the Gram Panchayat's waste management.
JCBs and Poclains Ravage Pune Hills; Environmentalists Raise Alarm
Marathi News Esakal
www.esakal.com