बी. आर्किटेक्चर पहिल्या यादीत अडीच हजार विद्यार्थ्यांना संधी

बी. आर्किटेक्चर पहिल्या यादीत
अडीच हजार विद्यार्थ्यांना संधी
Published on

पुणे, ता. १२ : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी. आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत तीन हजार ४४९ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ५३२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. यात ९७६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
राज्यात तीन हजार ७१७ विद्यार्थ्यांनी बी. आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी तीन हजार ४४९ विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले. याच विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीत प्रवेशासाठी विचार करण्यात आला. या विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ५३२ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत विविध पसंतीक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश उपलब्ध झाले आहेत.
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑटो फ्रिज झाले आहेत. या विद्यार्थ्यांना संबंधित पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी काही कारणाने हा प्रवेश नाकारला तर या विद्यार्थ्यांना दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. या विद्यार्थ्यांना थेट त्यानंतरच्या खुल्या फेरीत म्हणजे संस्थात्मक फेरीत सहभागी होता येईल, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.
पहिल्या फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत (ता. १३) महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून, शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या तात्पुरत्या रिक्त जागांचा तपशील शुक्रवारी (ता. १४) जाहीर करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

BBA, BMS, BBM and Integrated MBA 2026-27: First CAP Round offers admission opportunities to 12,282 students
Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 First Installment Of Rs 7000 Crore Approved For Eligible Farmers
Engineering CAP Round 1 seat allotment result
Big Relief for Maharashtra Students as BE/BTech CAP Registration Gets Extension
Marathi News Esakal
www.esakal.com