सीईटीचेही वेळापत्रक नव्याने ठरणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

लाॅकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा कधी होणार, सीईटी लांबल्यास पुढील प्रवेश कसे होणार याबाबत विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. याबाबत स्पष्टता यावी अशी मागणी ही केली जात होती. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी  व्हिडिओ काॅन्फरन्सींगमध्ये प्रत्येक विद्यापीठाच्या किती परीक्षा झाल्या, किती शिल्लक याचा आढावा सामंत यांनी घेतला. कोरोना मुळे पुढे लाॅकडाऊन किती वाढणार याचाही विचार करण्यात आला. 

पुणे : 'कोरोना'मुळे राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा व सीईटी परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न होता सर्व परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी कुलगुरू व अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

लाॅकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा कधी होणार, सीईटी लांबल्यास पुढील प्रवेश कसे होणार याबाबत विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. याबाबत स्पष्टता यावी अशी मागणी ही केली जात होती. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी  व्हिडिओ काॅन्फरन्सींगमध्ये प्रत्येक विद्यापीठाच्या किती परीक्षा झाल्या, किती शिल्लक याचा आढावा सामंत यांनी घेतला. कोरोना मुळे पुढे लाॅकडाऊन किती वाढणार याचाही विचार करण्यात आला. 

सामंत म्हणाले, "विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटीसेलने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलेल्या आहेत, पण त्या तरी त्या रद्द होणार नाहीत. या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्यामुळे या अफवांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये. नवे वेळापत्रक ठरविण्यासाठी समिती स्थापन केली असून, यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसएनडीटी विद्यापीठांच्या कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांचा समितीमध्ये समावेश आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करतील त्यानंतर परीक्षेचा निर्णय घेतला जाईल. 'कोरोना'मुळे शैक्षणिक वर्ष किमान दीड महिना पुढे ढकलले जाणार आहे, असे सामंत यांनी संगितले.

"विद्यापीठाच्या परीक्षांसाठी अॅक्शन प्लान ए आणि बी तयार केले जाणा आहे. प्लान ए मध्ये लाॅकडाऊन संपल्यावर परीक्षा घेण्याचे नियोजन असेल. तर प्लान बी मध्ये लाॅकडाऊन लांबले आणिबाणीची स्थिती निर्माण झाली तर परीक्षा कशा घ्यायचा याचे नियोजन असेल. याबाबत राज्यपालांना उद्या माहिती दिली जाणार आहे."
- उदय सामंत, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The CET schedule will also be updated