विंग जिल्हा परिषदेच्या टाके वस्ती चचेगाव शाळेत आजी आजोबा स्नेह मेळावा रंगला

विंग जिल्हा परिषदेच्या टाके वस्ती चचेगाव शाळेत आजी आजोबा स्नेह मेळावा रंगला

Published on

चचेगाव शाळेत आजी-आजोबा स्नेहमेळावा

विंग, ता. ६ ः जिल्हा परिषदेच्या टाकेवस्ती (चचेगाव) शाळेने आजी-आजोबा स्नेहमेळावा आणि राजभाषा दिन उत्साहात झाला. अनोख्या उपक्रमाने शैक्षणिक वाटचालीत भर घातली. विद्यार्थ्यानी आजी-आजोबांचे पाद्यपूजन करून आशीर्वाद मेळाव्याचे खास वैशिष्ट्य ठरले.
शाळेत विद्यार्थी अन् घरी नांतवडे म्हणून, नितांत प्रेम करणारे चांगले संस्कार घडवणारे आजी-आजोबांना टाकेवस्ती शाळेने निमंत्रित केले. बहुतेक आजी-आजोबांनी मेळाव्याला हजेरी लावली. लेझीम पथकाच्या सवाद्यात आगमनानंतर पुष्पवृष्टीने स्वागत केले. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतले. जुन्या आठवणींना उजाळा देताना आजी-आजोबा भावुक झाले. डोळ्याच्या कडा ओलावल्या. नातवंडाचे कौतुक करताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अभ्यासकाकडे लक्ष देण्यासह कर्तव्याची जाणीव मनोगतातून व्यक्त केली. शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका अलका ढवळे आणि विद्यार्थ्यांनी कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे, शिक्षण विस्ताराधिकारी जमिला मुलाणी, केंद्रप्रमुख सर्जेराव केंजळे, सरपंच महेश पवार, उपसरपंच तानाजी थोरात, अमोल पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अनिता पवार, उपाध्यक्षा प्रणाली गवळी, अमृता पवार, रूपाली पवार, सदस्य, पालक ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका सुरेखा आवळकर यांनी स्वागत केले. अलका ढवळे यांनी आभार मानले.


B02219
टाकेवस्ती (चचेगाव) ः शाळेत आजी-आजोबा स्नेहमेळाव्यात पाद्यपूजन करून आशीर्वाद घेताना विद्यार्थी.

------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com