Chain-Snatching Gang Busted
sakal
मंचर - मंचर (ता. आंबेगाव) बसस्थानक परिसरात एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीला मंचर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक केली आहे. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार असा एकूण ६ लाख ९२ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर चोरट्यांची टोळी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील आहे.