Pune Crime : सोनसाखळी चोरट्यांचा धुडगूस सुरूच, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले
Chain Snatching : पुण्यात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दोन महिलांचे सुमारे दोन लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना हडपसर व सहकारनगरमध्ये घडल्या.
पुणे : दुचाकीस्वार चोरट्यांनी दोन महिलांचे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या. याबाबत हडपसर आणि सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.