
मार्केट यार्ड : राज्यात उत्पन्नात अग्रेसर असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा दिलीप काळभोर यांनी राजीनामा दिल्यामुळे सभापती निवडीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. सभापतिपदासाठी इच्छुक असलेल्या एका संचालकाने इतर ११ संचालकांना सहलीवर नेल्याचे समजते. या घडामोडीमुळे १८ जुलै रोजी होणाऱ्या निवडीपूर्वी उत्सुकता शिगेला पोचली आहे.