

ओतूर, ता. ३१ : ओतूर (ता. जुन्नर) येथील चैतन्य विद्यालयाच्या सन १९७३-७४ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (ता. ३०) धुरनळीजवळील श्रीरंग फार्म येथे उत्साहात पार पडला. तब्बल ५२ वर्षांनंतर ४५ माजी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला. अनेक वर्षांनंतर एकमेकांना भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
गणेशपूजनानंतर किसन ठिकेकर, मुरलीधर पानसरे, अशोक अ. डुंबरे, गजानन डुंबरे, किसन फापाळे, तारा डुंबरे-शेटे व पुष्पा ठिकेकर-दाते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी दिवंगत सहकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
स्नेहमेळाव्यात प्रत्येकाने स्वतःचे शिक्षण, नोकरी-व्यवसाय तसेच कौटुंबिक जीवनातील माहिती सांगितली. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मते यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. कवयित्री पुष्पा पानसरे-सदाकाळ यांनी स्नेहमिलनावरील कविता सादर केली.
माजी विद्यार्थिनींनी पुरुष सहकाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. दुपारी सर्वांनी पारंपरिक भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर धुरनळी धबधबा व परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेत पुन्हा स्नेहमेळाव्याच्या स्थळी परतण्यात आले. यावेळी कांता पानसरे-पारखे यांनी दोन कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
मेळाव्याच्या यशस्वितेसाठी किसन फापाळे, वसंत अप्पा डुंबरे, गजानन डुंबरे, जालिंदर सरोदे, सुरेश गावडे व महादेव ओतूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी वसंत डुंबरे यांनी आभार मानले. सुरेश गावडे यांनी सूत्रसंचालन तर महादेव ओतूरकर यांनी प्रास्ताविक केले.
02372
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.