Mcoca Crime : चाकणच्या पंधरा गुन्हेगारांवर मोका कारवाई

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनानुसार पंधरा गुन्हेगारांवर मोका कारवाई केली आहे.
Mokka crime
Mokka crimeSakal

चाकण - चाकण व परिसरातील औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारी नियंत्रित आणण्यासाठी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनानुसार पंधरा गुन्हेगारांवर मोका कारवाई केली आहे. यामध्ये टोळीप्रमुख व सदस्यांचा समावेश आहे.

मोका, तडीपारी, एमपीडीए कारवाई करून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. अजूनही काहींचे प्रस्ताव देण्यात येणार आहे. अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या गुन्हेगारावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ज्या गुन्हेगारांचा समाजाला व इतर घटकांना उद्योजक, व्यावसायिकांना त्रास होतो आहे अशा गुन्हेगारांच्या टोळ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच साखळी गुन्हेगारी मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंधरा गुन्हेगारावर मोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

यामध्ये आरोपी गणेश चव्हाण (रा. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे), संतोष मोहिते (रा. रांजणगाव, शिरूर), विकी जाधव (रा. जिंतूर, जि. परभणी), किरण राठोड (रा. दिघी, पुणे. टोळीप्रमुख), अर्जुन सूर्यवंशी (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर, टोळी सदस्य), अरविंद उर्फ सोनू नवनाथ घोलप (रा. रामटेकडी, पुणे, टोळी सदस्य), सागर हाके (रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि.पुणे टोळी सदस्य), सुमित मुदलियार (रा. आंबेगाव पठार, कात्रज, पुणे, टोळी सदस्य), आकाश शिंदे (रा. रामटेकडी, पुणे. टोळी सदस्य), शुभम सरोदे (रा. नाणेकरवाडी, चाकण. टोळीप्रमुख), प्रणित उर्फ पन्या दयानंद गोसावी (रा. चाकण, ता. खेड), अजय होले (रा. हडपसर, गाडीतळ, पुणे. टोळी सदस्य), शुभम उर्फ सोन्या विनोद काकडे (रा. नाणेकरवाडी, चाकण. टोळी सदस्य), नवनाथ बच्चे (रा. कडाचीवाडी, चाकण. टोळी सदस्य), आकाश भुरे (रा. नाणेकरवाडी, चाकण. टोळी सदस्य) यांचा समावेश आहे.

हे सर्व गुन्हेगार 19 ते 24 वयोगटातील आहेत. एमपीडीए कायद्यानुसार आरोपी किशोर कुऱ्हाडे (रा. मुटकेवाडी, चाकण) याच्यावर एमपीडीएची कारवाई करण्यात आली असून, त्याला येरवडा जेल येथे स्थानबद्ध करण्यात आलेले आहे.

पोलिसांच्या कारवाईमुळे तसेच इतर गुन्हेगारांचे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचे पोलीस निरीक्षक कदम यांनी सांगितले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, विक्रम गायकवाड, पोलीस हवालदार झनकर, कांबळे, शेटे, गुंजाळ, सानप, पोलीस शिपाई कोळी, महिला पोलीस शिपाई गावडे, राक्षे यांनी केली आहे.

चाकण परिसरामध्ये देशातील तसेच राज्यातील मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आला आहे. राज्यातील तसेच परराज्यातील गुन्हेगारी या परिसरात फोफावते आहे. चाकण, महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचे प्रकारही वारंवार घडत आहेत. यात अल्पवयीन तरुणांचा समावेश मोठा आहे. औद्योगिक वसाहतीत उद्योजक, व्यावसायिकांना तसेच सर्वसामान्य कामगार वर्गाकडे ही काही गुन्हेगार खंडणी मागतात.

ठेकेदारीवरून वादावादी, हाणामारीचे प्रकार करतात धमक्या देतात. इझी मनी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी सुरू आहे. त्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारावर एक प्रकारचा वचक बसण्यास मदत होते आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com