

Father-daughter killed in a tragic Chakan accident while heading for Raksha Bandhan; their funeral was held in Avsari Khurd.
Sakal
मंचर : रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या बाप-लेकीवर चाकण (ता. खेड) येथे काळाने घाला घातला. भीषण अपघातात मयुरी राजेंद्र भोर (वय १४) आणि तिचे वडील राजेंद्र बंडा भोर (वय ४२, रा. अवसरी खुर्द, सध्या निरगुडसर, ता. आंबेगाव) यांचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. २९) मध्यरात्री एकच्या सुमारास अवसरी खुर्द येथील वैकुंठभूमीत मयुरी आणि राजेंद्र यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.