Chakan News : चाकण परिसरात अवैध वेश्या व्यवसायाला ऊत; औद्योगिक वसाहतीत लुटीचे प्रकार

चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर रात्रीच्या वेळी तसेच काही रस्त्यावर दिवसाच्या वेळी वेश्या व्यवसायाला ऊत आलेला आहे.
prostitution
prostitutionsakal

चाकण - येथील औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर रात्रीच्या वेळी तसेच काही रस्त्यावर दिवसाच्या वेळी वेश्या व्यवसायाला ऊत आलेला आहे. त्यामुळे काहींची विशेषतः कामगारांची सोन्याच्या दागिन्यांची तसेच रोख रक्कमेची लूट होत आहे. तर काहीजण या व्यवसायाला बळी पडत आहेत.

परप्रांतीय कामगार मात्र या व्यवसायाला बळी पडत आहेत हे भयानक वास्तव आहे. सुमारे पाचशे वर तृतीय पंथी, वेश्या व्यवसाय करणाऱ्या, महिला तरुणी दिवसा, रात्री औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर कार्यरत आहेत. त्यांच्या पाठीमागे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यातून हा धंदा राजेरोसपणे चालू आहे.

चाकण, ता. खेड येथील औद्योगिक वसाहतीतील चाकण-तळेगाव रस्ता, एमआयडीसी फाटा- निघोजे रस्ता, चाकण-आळंदी रस्ता, भांबोली फाटा या रस्त्यावर प्रामुख्याने रात्रीच्या वेळी रात्री आठ ते अकरा, बाराच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालतो.

अनेक तृतीयपंथी काही महिला, काही तरुणी या रस्त्यावर राजरोसपणे उभ्या असतात. येणाऱ्या, जाणाऱ्यांना हातवारे करतात. येणारे, जाणारे काही कामगार, वाहन चालक तिथे थांबतात. आणि गैरप्रकार केले जातात. याचा त्रास मार्गांवरून येणाऱ्या, जाणाऱ्यांना होतो.

अगदी पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक विभागाच्या पोलीस चौकीच्याजवळ हा व्यवसाय पुणे- नाशिक महामार्गजवळ मोकळ्या जागेत दगडाच्या खाणीत सुरू आहे. वाहतूक विभागाच्या पोलीस चौकीजवळ हा व्यवसाय रात्रीच्या वेळेस सुरू असतो. तृतीयपंथी, काही तरुणी, काही महिला हा वेश्या व्यवसाय करतात.

आळंदी मार्गावर आळंदी फाट्याच्या पुढे दिवसाही वेश्या व्यवसाय सुरू असतो. काही बेकायदेशीर हॉटेल, लॉज मध्ये गैरप्रकार सुरु आहेत. रस्त्याच्या कडेला या महिला, तरुणी, तृतीयपंथी उभे राहतात. अश्लील हातवारे करतात. या गैर प्रकारावर कारवाई व्हावी अशी नागरिकांची, काही कामगारांची, उद्योजकांची मागणी आहे.

काही तृतीयपंथी, महिला, तरुणी पोटासाठी वेश्या व्यवसाय करतात असेही निदर्शनास येत आहे. वेश्या व्यवसाय करताना काही अनाधिकृत लॉजचा वापर केला जातो. महाळुंगे, खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मेदनकरवाडी गावच्या हद्दीत तसेच चाकण- तळेगाव मार्गाच्या कडेला काही तात्पुरते आडोसे तृतीयपंथी वेश्याव्यवसाय करणाऱ्या काही, महिला, तरुणींनी केले आहेत.

रात्रीच्या वेळेस हे काळे धंदे येथे चालतात असे नागरिकांचे, कामगारांचे म्हणणे आहे. काही लुटीचे प्रकार ही घडतात. काही वेळा काही घटना घडल्यास पोलीस कारवाई करतात. परंतु पोलिसांच्या कारवाईवरही मर्यादा येत आहेत.

तृतीयपंथीयांकडून काही वेळा कामगारांना लुटण्याचे प्रकारही औद्योगिक वसाहतीत होत आहेत. कामगारांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधितावर कारवाई होत आहे. काही लुटीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात आल्या आहेत.संबंधित तृतीय पंथीयावरती कारवाई करण्यात आलेली आहे.

लुटण्याचे प्रकार करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई सातत्याने करून असे प्रकार बंद करण्यात येणार आहे. अशी माहिती महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.

तृतीयपंथीयांकडून वेश्या व्यवसाय करणाऱ्यांकडून काही वेळा रात्रीच्या वेळी त्यांना अडवून कामगारांची लूट होते त्यांचे सोन्याचे दागिने अंगठी, चैन आदी व रोख रक्कम लुटली जाते. अशावेळी कंपनीतील कामगार तसेच काही कर्मचारी लूट झाली तरी पोलीस ठाण्यात बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाही हे भयानक वास्तव असल्याचे कामगारांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com