
PMRDA Land Return
Sakal
चाकण : येथे सध्या नगर परिषद पीएमआरडीए, एनएचएआय यांच्या वतीने अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही कारवाई करण्यात येत आहे. परंतु ही अतिक्रमणे काढल्यानंतर काही अतिक्रमणधारकांनी पुन्हा अतिक्रमणे केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, असे पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी "सकाळ "शी बोलताना सांगितले.