

चाकण, ता. ४ : येथील श्री संत सावता माळी वधू-वर सूचक मंडळातर्फे आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात ३०० मुले आणि केवळ ५० मुलींनी नोंदणी केल्याने समाजातील मुलींच्या घटत्या संख्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चाकणमधील महिलांच्या आर्थिक सहकार्यातून हा मेळावा उत्साहात झाला.
या मेळाव्याचे उद्घाटन राजगुरुनगरचे माजी सरपंच शांतारामबापू घुमटकर, माजी आमदार दिलीप मोहिते, चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे, वैशाली काळे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा शोभा शेवकरी, उपाध्यक्षा मीना गोरे, संस्थापक राजूशेठ घुमटकर, ज्येष्ठ सल्लागार तुकाराम कांडगे आदी उपस्थित होते. मुलींचे घटते प्रमाण ही समाजासाठी चिंताजनक बाब असल्याचे मत तुकाराम कांडगे यांनी व्यक्त केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी मंगल जाधव, मंगल शेवकरी, मंगल गोरे, रूपाली जाधव, स्वाती गवते, अर्जुन गोरे, रमेश वाघ, नथू गोरे, बबन टिळेकर, गोरक्षनाथ कांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुलींचे प्रमाण घटल्याने चिंता
मेळाव्यात ३०० मुलांच्या तुलनेत केवळ ५० मुलींनी नोंदणी केल्याने मोठी तफावत दिसून आली. मुलांना विवाहासाठी मुली कशा मिळणार, हा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असून, हे प्रमाण चिंताजनक असल्याचे तुकाराम कांडगे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.