अवजड वाहनांचा वाहतुकीला अडथळा

अवजड वाहनांचा वाहतुकीला अडथळा
Published on

चाकण, ता. १४ : चाकण औद्योगिक वसाहतीत अवजड वाहने वारंवार बंद पडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, या कोंडीत रुग्णवाहिका अडकून रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. खराब वाहने आणि इंधन संपण्याच्या प्रकारांमुळे कामगार व उद्योजकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
औद्योगिक पट्ट्यात ट्रक, कंटेनर आणि ट्रेलरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ते रस्त्याच्या मधोमध उभे राहत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. वाहनांची देखभाल न करणे, इंजिन गरम होणे आणि क्षमतेपेक्षा जास्त माल भरणे ही यामागची मुख्य कारणे आहेत. अनेकदा डिझेल संपल्यामुळेही वाहने बंद पडत असल्याचे समोर आले आहे. याचा सर्वाधिक फटका कामावर जाणाऱ्या कामगारांना आणि आपत्कालीन सेवांना बसत आहे.
प्रशासनाने ही वाहने हटवण्यासाठी स्वतंत्र क्रेनची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. वाहतूक पोलिसांनी खराब वाहनांवर कारवाई करून नियमित तपासणी मोहीम राबवावी, जेणेकरून चाकणमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

चाकण औद्योगिक वसाहत व परिसरात दररोज वीस वाहने बंद पडतात. यामध्ये अवजड वाहनांचे प्रमाण मोठे आहे. कंटेनर, ट्रक, ट्रेलर, टँकर, बस अशी मोठी वाहने बंद पडल्यानंतर ती बाजूला करण्यासाठी क्रेन बोलवावी लागते. त्याच्यात अर्धा, एक तास वेळ जातो. काही वाहनांचे मालक क्रेनचा खर्चही देत नाहीत. तो खर्चही आम्हाला करावा लागतो.
- नीलेश वाघमारे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, महाळुंगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com