
आंबेठाण : चाकण एमआयडीसीमध्ये सुरू असणारी अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती ही रस्त्यांसाठी मलमपट्टी तर कामगार आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.टप्पा क्रमांक दोन मधील अंतर्गत रस्त्यांची अवघ्या काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात आले होते.परंतु अवघ्या सहा ते सात महिन्यात या रस्त्याची दुरूस्ती करावी लागत आहे. त्यामुळे त्यावेळी करण्यात आलेल्या या कामाचा दर्जा काय असेल ? असा प्रश्न निर्माण होत आहे.अशा कामांमधून केवळ ठेकेदार पोसले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.