Meal Coupons Distributed to Influence Voters in Chakan
Sakal
पुणे
Chakan Election : घ्या कूपन घ्या जेवण; हॉटेल्स फुल्ल; उमेदवारांची स्पर्धा तीव्र; चाकणमधील निवडणूक प्रचाराला अनोखे वळण!
Free Meal Campaign Strategy : चाकण नगरपरिषद निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘घ्या कूपन, घ्या जेवण’ असा नवा फंडा जोरात सुरू आहे. हॉटेल्स फुल्ल असून उमेदवारांकडून भेटवस्तू, कूपन आणि रोख देण्याची स्पर्धा रंगली आहे.
चाकण : नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदाराला प्रलोभित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत .मतदारांना घरोघरी जाऊन भेटवस्तू, साड्या देण्यात येत आहेत तर मतदाराला त्याच्या यादीनुसार मताला रोख रक्कमही दिली जात आहे त्याचे वाटपही सुरू आहे. मतदाराला खुश करण्यासाठी हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांकडून जेवणावळी दिली जात आहे .त्यामुळे मतदारासाठी "घ्या कुपन, घ्या जेवण" असा फंडा सुरू आहे.

