

High Drama in Chakan: Onion Farmers' Meet Turns into a Political Battleground
Sakal
चाकण : येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजार आवारात आज कांदा प्रश्नी शेतकरी व शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खेडचे आमदार बाबाजी काळे, देवदत्त निकम, शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर, सुभाष पवळे, गजानन गांडेकर, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, हिरामण सातकर, खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, राजमाला बुट्टे पाटील, बाळासाहेब लिंभोरे, बाळासाहेब गायकवाड, रामदास धनवटे, सयाजी मोहिते, महेंद्र गोरे, शिवाजी वर्पे, लक्ष्मण जाधव आदी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.