Rising onion prices in Chakan market bring relief to farmers but increase household expenses for consumers.
esakal
चाकण, : दिवाळीत चाकणच्या बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. कांद्याचा भाव प्रतिकिलो ४४ रुपयांपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांकडून थोडी चिंता तर शेतकरी, व्यापारी समाधान व्यक्त करत आहेत.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात शनिवारी (ता. ७) जुन्या कांद्याची आवक ९०० क्विंटल झाली. या कांद्याला प्रतवारीनुसार किमान ३७ तसेच ४४ रुपये प्रतिकिलो कमाल बाजारभाव मिळाला.