Pune Crime : चाकणमध्ये बेकायदा राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांची कारवाई, हद्दपारीची प्रक्रिया सुरू
Chakan Police Detains Bangladeshis : चाकण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मेदनकरवाडी येथील बंगला वस्तीतून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
चाकण : चाकण येथे बेकायदा राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई सुरू केली आहे. याबाबतची माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली.