

चाकण, ता. २५ : चाकणमध्ये रिक्षाचालकाने स्टंटबाजी करत दादागिरी केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या प्रकारामुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित तरुणाने दिलगिरी व्यक्त केली असून, त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औद्योगिक तसेच व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेल्या चाकण परिसरात नागरिक, कामगार, विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते. अनेक वाहनचालक नियमांना हरताळ फासून बेशिस्तपणे वाहने चालवतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि दादागिरीचे प्रकार घडतात. या ताज्या घटनेमुळे सार्वजनिक रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा वर्तनामुळे इतर वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्याही जीविताला धोका निर्माण होतो. या स्टंटबाजीला कायमचा ब्रेक लागावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. पोलिसांनी नियमभंग करणाऱ्यांवर सातत्याने लक्ष ठेवून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः औद्योगिक वसाहतीत काही तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी अशाप्रकारे स्टंटबाजी करतात, त्यांच्यावरही कारवाई व्हावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, ही भावना कृतीतून दिसणे गरजेचे आहे.
कृष्णा गिरी या तरुण रिक्षाचालकाने रस्त्यावर स्टंटबाजी केली होती. दादागिरीचा व्हिडिओ समाज माध्यमावर टाकला होता. त्याला समज देण्यात आलेली आहे. त्याच्यावर अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.
- संजय सोळंके, वरिष्ठ निरीक्षक, चाकण दक्षिण पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.