Chakan Road Works : रस्त्यांची कामे रखडल्याने ७५ लाखांचा दंड चाकणमधील परिस्थितीनंतर ‘पीएमआरडीए’ आयुक्तांची ठेकेदारावर कारवाई

PMRDA Imposes ₹75 Lakh Fine on Road Contractor : चाकण परिसरातील सात रस्त्यांच्या कामांना विलंब होत असल्याने पीएमआरडीएने संबंधित ठेकेदाराला तीन रस्त्यांसाठी प्रत्येकी २५ लाख, असा एकूण ७५ लाखांचा दंड ठोठावला आहे.
Chakan Road Works

Chakan Road Works

esakal

Updated on: 

पिंपरी : चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) विविध सात रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, ती संथगतीने होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला तीन रस्त्यांच्या कामांसाठी प्रत्येकी २५ लाख, असा ७५ लाखांचा दंड ठोठावला आहे. चाकण ‘डी-क्लॉगिंग’ प्रकल्पांतर्गत सात रस्त्यांची कामे सुरू आहेत. ती डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, वाहतूक कोंडी, एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी, अपुरे मनुष्यबळ यांसह विविध कारणांमुळे कामांना उशीर होत आहे. त्यामुळे मे. क्रिष्णाई इन्फ्रा. प्रा. लि. या ठेकेदार कंपनीला वारंवार सूचना देऊनही कामाची गती वाढली नाही. याचा फटका बसून, वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे वाहनांसाठी पर्यायी मार्गांचे नियोजन करताना पोलिसांनाही अडचणी येत आहेत.

परिणामी, नागरिकांकडून तक्रारी वाढल्या. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी रस्त्यांची पाहणी करत दंड ठोठावण्याचे आदेश दिले. जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने आढावा चाकण आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांनी तोंड वर काढल्यानंतर उद्योजक आणि स्थानिकांनी प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण परिसराची पाहणी केली. तेथे सुविधा पुरवण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखावा, कामांचा नियमित आढावा घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिल्या. त्यानुसार ‘पीएमआरडीए’कडून आता चाकण आणि परिसरातील कामांबाबत आढावा घेतला जात आहे. तर, हिंजवडी परिसरातही रस्ते आणि अन्य सुविधा पुरवण्याबाबत प्रशासन प्रयत्न करत आहे.

हिंजवडीतही भूसंपादन रखडले हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सहा रस्त्यांची आखणी करण्यात आली आहे. मात्र, भूसंपादन रखडले आहे. यापैकी दोन रस्त्यांसाठी सुमारे ७० टक्के ग्रामस्थांची संमती मिळाली आहे. मात्र उर्वरित प्रक्रिया पूर्ण करणे, प्रत्यक्ष ताबा मिळवण्यासह अन्य कामांसाठी आणखी पाच ते सहा महिने लागण्याची शक्यता आहे.

आणखी चार कामे रखडली चाकणमधील आणखी चार रस्त्यांची कामे विविध कारणांमुळे रखडली आहेत. काहींच्या मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहे. मेदनकरवाडीला जोडणाऱ्या रस्त्याच्या आराखड्यात काही बदल करण्यात आले आहेत. खराबवाडी रस्त्याबाबत तांत्रिक अडचणी असून, संबंधित मार्गावर बांधकामे झाल्याने निर्णय प्रलंबित आहे. नाणेकरवाडी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी अद्याप भूसंपादन प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांना अडथळे निर्माण झाले आहेत, असे प्रशासनाने सांगितले.

"चाकणमधील रस्त्यांची कामे सुरू असून, त्यांची वेळोवेळी पाहणी केली जात आहे. कामांना गती देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. काही रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे."

- डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त, ‘पीएमआरडीए’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com