तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त
Published on

चाकण,ता. ८ : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ५४ किलोमीटरच्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम अखेर जून महिन्यात सुरू होणार आहे. ''बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा'' (बीओटी) तत्त्वावर होणाऱ्या या प्रकल्पासाठी मोंटेकार्लो लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली असून, ४२०७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (एमएसआयडीसी) देखरेखीखाली हे काम पार पडणार आहे. या प्रकल्पाची निविदा २१ फेब्रुवारी रोजी स्वीकारण्यात आली. या महामार्गाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण तो मुंबई-पुणे, पुणे-नाशिक आणि पुणे-अहिल्यानगर या तीन महत्त्वाच्या मार्गांना जोडतो. दररोज दीड लाखांहून अधिक वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर सध्या खड्डे आणि अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दहा वर्षांत येथे सुमारे दीड हजार जणांना प्राण गमवावे लागले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली आहे. ''सकाळ''नेही या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला होता. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने उद्योजक, कामगार आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
उन्नत मार्ग (उड्डाणपूल) : तळेगाव ते चाकण रासे फाटा दरम्यान २६ किमीचा चार पदरी उन्नत मार्ग.
समतल रस्ता : रासे फाटा ते शिक्रापूर दरम्यान जमिनीवर सहा पदरी मार्ग.
कालावधी : वर्क ऑर्डर मिळाल्यापासून चार वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन.
सवलत कालावधी : २९ वर्षांच्या ''डीएफबीओटी'' तत्त्वावर आधारित प्रकल्प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com