
चाकण : राज्य सरकारने यापूर्वी चार लेनच्या उड्डाण पुलाला (एलिव्हेटेड मार्ग)तळेगाव चाकण मंजुरी दिली होती . वाढत्या वाहतुकीमुळे औद्योगिक वसाहतीमुळे तळेगाव ,चाकण, शिक्रापूर असा सुमारे सहा लेनचा उड्डाणपूल मार्ग व जमिनीवर सहालेन होणे गरजेचे आहे. चार लेनचा मार्ग अजिबात नको. दररोज एक लाखावर वाहने ये जा करतात.त्यामुळे वाहतूक कोंडी सुरळीत होऊ शकेल असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मोबाईलवर संपर्क साधून केले .यासाठी निधी कमी पडून देणार नाही असेही आश्वासन दिले. त्यामुळे हा मार्ग बदलला असून नव्याने सहालेनचा उड्डाण पूल व सहालेन जमिनीखाली असा मार्ग होईल त्याच्या निविदा काढल्या जातील असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चाकण येथे दिले.