
आंबेठाण: चाकण-वासुली फाटा (ता.खेड) हा सिमेंटचा नवीन रस्ता झाल्यापासून अपघातांची मालिका सुरूच आहे. मंगळवार, दि. १० रोजी पुन्हा भांबोली येथे अपघात झाला असून त्यात एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अवजड हायवा वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला.