चाकणला १०० टन रताळ्याची आवक
चाकण, ता. १५ : येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजार आवारात रविवारी (ता. १५) महाशिवरात्री निमित्त १०० टन रताळ्याची आवक झाली. रताळ्याला प्रतिकिलोला २५ ते ३० रुपये बाजारभाव मिळाला.
नागपूरहून हिरव्या मिरच्यांची सुमारे ३० टन आवक झाली. हिरव्या मिरचीचे भाव प्रतिकिलोमागे ३० रुपयांनी वाढले. राजस्थानातून गाजराची सुमारे २० टन आवक झाली. गाजराला घाऊक बाजारात प्रतिकिलोला २५ रुपये भाव मिळाला. मध्यप्रदेशातून हिरव्या वाटाण्याची सुमारे २० टन आवक झाली. हिरव्या वाटाण्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला २५ ते ३० रुपये भाव मिळाला. गुजरात, नागपुरातून हिरव्या, काळ्या व पिवळ्या मिरचीची मिळून सुमारे ३० टन आवक झाली. मध्यप्रदेशातील इंदोर बटाट्याला तसेच स्थानिक नव्या बटाट्याला प्रतिकिलोला १४ रुपये भाव मिळाला. कांद्याची सुमारे नऊ हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला प्रतिकिलोला आठ ते १६ रुपये भाव मिळाला.
नाशिक, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातून टोमॅटोची सुमारे ३० टन आवक झाली. टोमॅटोला घाऊक बाजारात प्रतिकिलोला १४ रुपये भाव मिळाला. हिरव्या मिरचीला घाऊक बाजारात भाव प्रतिकिलोला १०० रुपये मिळाला.
कोथिंबीर, मेथी, शेपू, पालकच्या सुमारे दोन लाखांवर जुड्यांची आवक झाली. मेथीच्या व कोथिंबिरीच्या एका जुडीला १२ रुपये भाव मिळाला. शेपू, पालकच्या एका जुडीला १० रुपये बाजारभाव मिळाला.
फळभाज्यांचे भाव पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो रुपयांमध्ये)
टोमॅटो (१४), कारली (२५ ते ५०), दोडका (४० ते ५०), भेंडी (२५ ते ३५), गवार (१००), कोबी (१२), फ्लॉवर (१५), वांगी (३०), हिरवी मिरची (१००), दुधी भोपळा (३०), शेवगा (१२०), ढोबळी मिरची (६०), चवळी (३०), हिरवा वाटाणा (२५ ते ३०), काकडी (३५), गाजर (२०), आले (आद्रक) (५०), वालवर (५० रुपये).
10178
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

