

चाकण, ता. १७ : दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाला उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, चाकण येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक घटल्याने बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. भाजीपाल्यामध्ये वाटाणा, टोमॅटो, गवार आदींच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. असे असले तरी नवी मुंबई आणि कोकणातील खरेदीदारांच्या गर्दीमुळे बाजारपेठ गजबजली आहे. यामुळे उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
स्थानिक भागातून होणारी फळभाज्या व पालेभाज्यांची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे भाव वाढले आहेत, असे बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे व सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले. विशेषतः हिरवा वाटाणा परराज्यातून येत असून त्याचे घाऊक १०० ते १२५ रुपये, तर किरकोळ दर २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत.
चाकण बाजार हा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र व कोकणासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. सध्या विहिरींची पाणीपातळी घटल्याने आणि सिंचनाच्या टंचाईमुळे स्थानिक भाजीपाल्याची लागवड कमी झाली आहे. परिणामी, पहाटेपासूनच बाजारात व्यापारी आणि वाहनांची वर्दळ असली तरी मालाची उपलब्धता मर्यादित आहे. परराज्यातून येणाऱ्या फळभाज्यांवरच सध्या बाजाराची मदार आहे.
पाऊस नसल्याने उत्पादन घटले आहे. भाव वाढले असले तरी शेतकऱ्यांकडे मालच नसल्याने त्यांचा फायदा होत नाही, उलट ग्राहकांना महागडा भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.
- विशाल पऱ्हाड, स्थानिक शेतकरी
असे आहेत बाजारभाव (प्रतिकिलोचे भाव रुपयांत)
भाजी..... घाऊक ....किरकोळ
टोमॅटो..... २० ते ३०..... ४०
भेंडी..... २० ते ५० ..... ८०
गवार..... ६० ते ७०..... १००
दोडका.....४० ते ५० .....८०
हिरवी मिरची .....६० .....८० ते १००
दुधी भोपळा.....४० ते ५०.....६०
काकडी.....४० .....६०
कारली.....४० ते ५० .....८०
मेथीची एक जुडी... १५ ते २०.....३०
कोथिंबीर एक जुडी.....१५ ते २०......३०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.