Chakan Waste Processing Project
esakal
चाकण : चाकण औद्योगिक वसाहतीसह परिसरातील १९ गावांच्या कचरा व्यवस्थापनाचा प्रश्नासाठी प्रस्तावित घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) हस्तांतर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच प्रकल्पाच्या संचालन आणि देखभालीसाठी कंत्राटदार नियुक्त करण्याकरिता निविदाप्रक्रिया राबविण्यात आली आहे.