
पुणे : चाकणसह परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी या भागातील अतिक्रमणांचा सर्व्हे करण्यात येत असून, संबंधितांनी अनधिकृत बांधकामे अथवा अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावेत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिला आहे.