esakal | कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; दरडी पडण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; दरडी पडण्याची शक्यता

कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; दरडी पडण्याची शक्यता

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : कोकण व पश्चिम महाराष्ट्रात बुधवार पासून आज अखेर सततच्या मुसळधार पावसामुळे दरडी पडण्याची शक्यता आहे. हवामान व पाऊस याचा अभ्यास करणाऱ्या सतर्क संस्थेने १८ जून २०२१ रात्री नऊ वाजल्या पासून पुढील २४ तासांसाठी ही शक्यता वर्तविली आहे.

दरडी पडण्यावर लक्ष ठेवा ते काही परिसरासाठी इशारा आहे. तीन दिवसातील झालेल्या पावसाचे प्रमाण आणि सध्या सुरु असलेला पाऊस लक्षात घेता, पुढील ठिकाणी दरड कोसळणे, डोंगरावरून दगड, माती वाहून येणे, झाडे पडणे, भिती पडणे, जमीन खचणे आदी घटना घडू शकतात. दरड प्रवण क्षेत्रांत राहणाऱ्या नागरिकांनी, तसेच घाट रस्त्यांनी प्रवास करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. असे आवाहन सतर्क या संस्थेच्या वतीने कळविले आहे.

हेही वाचा: पुणे दुसऱ्या टप्प्यात; काय आहेत निर्बंध? महापौरांनी दिली माहिती

जिल्हा / तालुका - दरडप्रवण क्षेत्र

  • अहमदनगर (अकोले), पुणे (जुन्नर)- माळशेज घाट, सावर्णे, कोल्हेवाडी, फोफसंडी, पाचणी, अंबिट, भंडारदरा, मुरशेट, शेंडी

  • पुणे (मावळ, मुळशी,हवेली, वेल्हे, भोर)- कार्ला, खंडाळा, दुधिवरे, उर्से, ताम्हिणी, लवासा, दासवे, सिंहगड, कडवे, घिवशी, पाबे, घोळ, वरंधा

  • रायगड- माथेरान, जुम्मापट्टी, सुकेळी, रायगड, मोरबे, दासगाव, चिंचाळी, केळवट, पोलादपूर, वाझरवाडी, चोलाई,श्रीवर्धन

  • रत्नागिरी- कशेडी, कुडपण, तुळशी, सारंग, दापोली, भोस्ते, रघुवीर, शिंदी, दाभोळ, गुहागर, गोवळकोट, संगमेश्वर, चिपळूण, चिंचघरी, कुंभार्ली, वेळणेश्वर, कुंभारखणी, मांजरे, कोंड्ये, कुरधुंडा, कोळंबे, पांगरी

  • सातारा- आंबेनळी, चिरेखिंड, कुडपण, महाबळेश्वर, सह्याद्रीनगर, मेढा, मार्ली, पसरणी, रुईघर, मांढरदेवी, शिरगाव, अंधारी, कोळघर, येवतेश्वर, रेवांडे, पोगरवाडी

  • कोल्हापूर- भुईबावडा, गगनबावडा, वैभववाडी, करूळ, फोंडा

  • सिंधुदुर्ग, गोवा- सावंतवाडी, इन्सुली, आंबोली, पारघार- नामखोल रस्ता, चोर्ला, पेडणे, मसुरे, अमरड, बिल्वास, देवळी, मायनेवाडी

loading image
go to top