पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन तास पावसाची शक्यता

पुणे शहर आणि परिसरात पावसाची ये-जा सुरू आहे. सध्या ऊन आणि त्यातच ढगाळ वातावरण निर्माण होत जोरदार पावसाच्या सरी, असे काहीसे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
Rainy Weather
Rainy Weathersakal
Updated on
Summary

पुणे शहर आणि परिसरात पावसाची ये-जा सुरू आहे. सध्या ऊन आणि त्यातच ढगाळ वातावरण निर्माण होत जोरदार पावसाच्या सरी, असे काहीसे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

पुणे - शहर आणि परिसरात पावसाची ये-जा सुरू आहे. सध्या ऊन आणि त्यातच ढगाळ वातावरण निर्माण होत जोरदार पावसाच्या सरी, असे काहीसे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. बुधवारनंतर (ता. २७) आता शुक्रवारी (ता. २९) पावसाच्या जोरदार सरींनी अचानक हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

दिवसभर उकाडा, ऊन आणि निरभ्र आकाश अशी शुक्रवारी दुपारपर्यंतची स्थिती होती. मात्र सायंकाळी साडेचारनंतर मात्र ढगाळ वातावरण तायर झाले, आणि बघता बघता पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. अवघ्या २० ते ३० मिनिटांमध्येच रस्त्यांवर साचलेले पाणी, वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालकांना देखील अडचणी उद्भवल्या. अत्यंत कमी वेळेत जास्त पाऊस मागील तीन दिवसात अशाच प्रकारचे चित्र दिसून येत आहे. या आधी बुधवारी (ता. २७) सुद्धा सायंकाळनंतर पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती.

गुरुवारी (ता. २८) रात्री उशिरा मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली. तर, शुक्रवारी सकाळपासून ऊन कायम होते. परंतु सायंकाळी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींमुळे पुणेकर अक्षरशः हैरान झाले.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे व परिसरावर असलेल्या दाट झगांमुळे मुख्य शहरासह उपनगरांमध्ये पावसाला सुरवात झाली. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला. जिल्ह्याच्या घाट परिसरात ही पावसाने जोर धरला. दरम्यान पुढील दोन तास कमी अधिक स्वरूपात पावसाची स्थिती अशीच राहणार असल्याचे ही हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Marathi News Esakal
www.esakal.com