Pune Rains : पुण्यात आज ढगाळ वातावरण; पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

पुणे : शहरासह उपनगरात शुक्रवारी दिवसभर पावसाने उघडीप घेतल्यानंतर आज दुपारनंतर पुन्हा ढग दाटून आले आहेत. त्यामुळे ढगांच्या गडगडाटासह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांनो आजही कार्यालयातून सुटल्यावर घरी लवकर परत जा. 

पुणे : शहरासह उपनगरात शुक्रवारी दिवसभर पावसाने उघडीप घेतल्यानंतर आज दुपारनंतर पुन्हा ढग दाटून आले आहेत. त्यामुळे ढगांच्या गडगडाटासह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांनो आजही कार्यालयातून सुटल्यावर घरी लवकर परत जा. शाळेतून मुलांना लवकर घरी घेऊन या आणि पावसात अडकलाच तर झाडाखाली किंवा झाडाच्या जवळपासही थांबू नका.

शुक्रवारी सकाळी काहीसे ढगाळ वातावरण होते. मात्र दिवसभरात पाऊस झाला नाही. आज दुपारी चारपर्यंत चांगले ऊन पडले होते. मात्र चारनंतर पुन्हा ढगाळ वातावरण झाले आहे. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शुक्रवारपर्यंत हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of rain due to Cloudy weather in Pune today

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: