

Pune University
esakal
पुणे - विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह मुंबई विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता ‘कुलपती पदक’ प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या या उपक्रमासाठी राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी १० लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश बुधवारी मुंबईतील लोकभवनात प्रदान करण्यात आला.