पुण्यातील घटना! चांदणी चौकातील 'शो'ची झाडे काका-काकूंनी कारमधून पळवली | Video Viral

Pune Chandani Chowk
Pune Chandani ChowkSakal

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मागच्या एका महिन्यापूर्वी झाले. त्यानंतर त्या ठिकाणी दुभाजकावर शोभेसाठी ठेवलेली झाडे एका व्यक्तीने आणि महिलेने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील चांदणी चौक येथे शोभेची झाडे ठेवण्यात आली आहेत. उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्यानंतर ही झाडे ठेवण्यात आली होती. त्यानंतर एका कारमधील महिलेने आणि व्यक्तीने उतरून ही झाडे चोरून नेल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा प्रकार भरदिवसा घडला आहे.

Pune Chandani Chowk
Local Video : एवढी मस्ती कशाला पाहिजे? लोकलच्या बंपरवर बसून तरूणांचा धोकादायक प्रवास

सदर व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांकडून शेअर करण्यात आला असून दिल्ली, नागपूरनंतर आता पुण्यातही रस्त्यावरील झाडे चोरणारे लोकं आले अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी या प्रकारानंतर आपला संताप व्यक्त केला आहे. रोज दोन चार रोपटे चोरीला गेले तर चौकात एकही झाड शिल्लक राहणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com