‘चांदोबा-चांदोबा भागलास का!’ नाट्याची मेजवानी

‘ब्यूटी अँड द बिस्ट’ या लघुकथेवर आधारित ‘चांदोबा-चांदोबा भागलास का!’ या बालनाट्यामधील एक दृश्‍य.
‘ब्यूटी अँड द बिस्ट’ या लघुकथेवर आधारित ‘चांदोबा-चांदोबा भागलास का!’ या बालनाट्यामधील एक दृश्‍य.

पुणे - विश्‍वास, दयाळूपणा, क्रूरता आणि राजकारण अशा अनेक भावभावना लोकसंगीताच्या माध्यमातून ‘चांदोबा चांदोबा भागलास का !’ हे बालनाट्य लहानग्यांसमोर आणले आहे.

‘ब्यूटी अँड द बिस्ट’ या लघुकथेवरून हे मराठी बालनाट्य साकारले आहे. यामध्ये थरार-संगीत, माणूसपण, त्याची सौंदर्यदृष्टी आणि त्याचे भावविश्‍व उलगडून दाखवले आहे. लोकसंगीतातील पोवाडा, भारुड, अभंग, नमन अशा अनेक अंगांचा सांस्कृतिक वारसा यातून पाहायला मिळतो. लहानवयाचे गायक सूत्रधार, बालनाट्यात सहसा पाहायला न मिळणारे हे प्रत्यक्ष सादरीकरण करतात, हे या नाटकाचे वैशिष्ट्य आहे. याचे दिग्दर्शन केतन क्षीरसागर यांनी केले असून संगीत मयूरेश माडगावकर आणि गीतकार तेजस रानडे यांनी दिले आहे. मूळ लघुकथेवर केतन क्षीरसागर आणि राजू बावडेकर यांनी नाट्यरूपांतर केले आहे. यापूर्वीच्या त्यांच्या ‘राजसिंह’ या निर्मितीने दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या रंगमंचावरही प्रयोग केले आहेत. गेल्या वर्षी ‘जश्‍न-ए-बचपन’ हे २४५ देशविदेशांतील निर्मितीमधून निवडले गेलेले एकमेव मराठी बालनाट्य होते. निर्माती पूजा बावडेकर आणि रीमा चित्रे यांनी पुन्हा एकदा ‘चांदोबा’चे शिवधनुष्य पेलले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com